S M L

मोदी सरकारला धक्का, मुख्तार अब्बास नक्वींना 1 वर्षाचा तुरुंगवास

Sachin Salve | Updated On: Jan 14, 2015 07:01 PM IST

मोदी सरकारला धक्का, मुख्तार अब्बास नक्वींना 1 वर्षाचा तुरुंगवास

14 जानेवारी : भाजप सरकारला आज (बुधवार) रामपूर कोर्टाने धक्का दिलाय. केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी 1 वर्ष तुरूंगवास आणि 4 हजाराचा दंड ठोठावला आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मुख्तार नक्वी यांनी कलम 144 लागू असताना आंदोलन केलं होतं. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर खटला दाखल झाला होता. या प्रकरणी आज नवी दिल्लीतील रामपूर कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने नक्वी यांना एक वर्ष तुरूंगवास आणि 4 हजाराचा दंड ठोठावला आहे. अल्पसंख्यांक गटाचे चेहरा समजले जाणारे नक्वी हे मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहे. नक्की यांना शिक्षा सुनावल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलती लागलंय. मात्र, आपण त्या आंदोलनात सहभागीच नव्हतो, आपल्याला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आलंय असा दावा नक्वी यांनी केला. तसंच रामपूर कोर्टाच्या या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात अपील करणार असंही नक्वींनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2015 07:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close