S M L

किरण बेदी, जयाप्रदा आणि शाझिया इल्मी भाजपमध्ये

Sachin Salve | Updated On: Jan 15, 2015 06:23 PM IST

किरण बेदी, जयाप्रदा आणि शाझिया इल्मी भाजपमध्ये

bedi jayaprada ilmi15 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा आता रंगत चढली असून आम आदमी पार्टीला एकपाठोपाठ धक्के बसणार आहे. आपमधून बाहेर पडलेले नेते भाजपच्या वाटेवर आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, अभिनेत्री जयाप्रदा आणि आपच्या बंडखोर नेत्या शाझिया इल्मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मागील वर्षी आपमधून बाहेर पडलेल्या किरण बेदींच्या भाजप प्रवेशाची आज दुपारी घोषणा होण्याची शक्यता आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पार्टीपासून फारकत घेतलेल्या शाझिया इल्मी यासुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत. आपची पोलखोल करणार असल्याचा पवित्रा शाझिया इल्मी यांनी घेतलाय. एवढंच नाहीतर भाजपच्या तिकिटावर शाझिया अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपलाही धक्का बसलाय. तसंच अभिनेत्री जयाप्रदाही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2015 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close