S M L

ओबामांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी हल्ल्याचं सावट

Sachin Salve | Updated On: Jan 15, 2015 06:04 PM IST

ओबामांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी हल्ल्याचं सावट

15 जानेवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजाकदिनाच्या कार्यक्रमासाठी भारतभेटीवर येणार आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या तोंडावर भारतात अतिरेकी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलाय. तब्बल दोनशे अतिरेकी पाकिस्तानमधून भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. हे अतिरेकी शाळा किंवा रहिवासी भागासारखे सॉफ्ट टार्गेट हेरण्याची शक्यता लष्कराच्या गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केलीय.

गेल्या काही दिवसांपासून सीमाभागावर पाकिस्तानच्या कुरापत्या सुरूच आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्‍यावर येत असल्यामुळे गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या इशार्‍यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी पाक सैनिकांनी बीएसएफ जवानांच्या चौक्यांवर गोळीबार केला तसंच गावावरही गोळीबार केला होता. एवढंच नाहीतर बुधवारी सोपोर भागात अतिरेक्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता पण भारतीय सैन्य हा डाव हाणून पाडला. आज पण पुलवामा जिल्ह्यात शोपिया भागात बीएसएफच्या जवानांनी दोन घुसखोरांना कंठस्नान घातलं. गेल्या 48 तासांत दुसर्‍यांदा अतिरेकी आणि सैन्यात चकमक उडालीये. पाककडून होत असलेल्या कुरापत्यामुळे सीमारेषेवर कडक सुरक्षा तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सीमारेषेवर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) जवानांचा खडा पहारा लावण्यात आलाय. तसंच अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आलंय. विशेष म्हणजे, राजस्थान आणि पाकच्या सीमेवर सध्या धुक्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन अतिरेकी घुसू शकतात याची खबरदारी घेत बीएसएफच्या जवानांकडून कडक बंदोबस्त लावण्यात आलाय. गुप्तचर यंत्रणनेनं दिलेल्या इशार्‍यानंतर हॉटेल, शाळा आणि रहिवासी भागात तपासणी सुरू करण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2015 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close