S M L

शाझिया इल्मी भाजपमध्ये, निवडणूक लढवण्यास नकार

Sachin Salve | Updated On: Jan 16, 2015 04:49 PM IST

शाझिया इल्मी भाजपमध्ये, निवडणूक लढवण्यास नकार

shazia_ilmi34523416 जानेवारी : आम आदमी पार्टीच्या बंडखोर नेत्या शाझिया इल्मी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शाझिया यांनी अगोदरच भाजपच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज शाझिया यांनी भाजप प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केलीय मात्र, शाझिया इल्मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आक्रमक होत मोर्चेबांधणीला लागली आहे. गुरुवारीच माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आज त्यांच्यापाठोपाठ आपच्या बंडखोर नेत्या शाझिया इल्मी भाजपमध्ये दाखल झाल्यात. इल्मी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. शहा यांनी इल्मी यांचं स्वागत केलं तर दिल्लीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्य यांनी इल्मी यांच्या भाजपप्रवेशाची घोषणा केली. भाजपमध्ये सामील होणं हे मी माझं भाग्य समजते.नरेंद्र मोदी देशाला नवीन दिशा देत आहेत. देशाची सेवा करणे हे माझं मुख्य उद्दिष्ट असून दिल्लीकरांसाठी चांगलं काम करायचंय अशी प्रतिक्रिया शाझिया यांनी दिली. तसंच आपण निवडणूक लढवणार नाही असंही इल्मी यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे भाजप प्रवेशाच्या अगोदर शाझिया यांनी आपची पोलखोल करणार असा दावा केला होता. शाझिया इल्मी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवणार अशी शक्यता होती पण त्यांच्या जागी आता किरण बेदी यांचं नाव वर्णी लागलंय. त्यामुळे शाझिया यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2015 04:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close