S M L

बलात्काराला विरोध केला म्हणून तरूणीचा खून

Sachin Salve | Updated On: Jan 16, 2015 05:08 PM IST

Image img_226632_rape34534_240x180.jpg16 जानेवारी :  बलात्काराला विरोध केली म्हणून एका 22 वर्षांच्या तरुणीचा चार नराधमांनी चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना अहमदाबादमध्ये घडलीये.

घडलेली हकीकत अशी की, मृत तरुणी ही उत्तरप्रदेशची राहणारी असून नारनपुरा परिसरातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहते. तिचं बीरबल नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. मृत तरुणी आणि तिचा प्रियकर बीरबल रेल्वे ट्रॅकजवळ बसले होते. त्यावेळी चार जणांचं एक टोळकं तिथं आलं आणि या दोघांना त्रास देऊ लागले. चौघांनी तित्या प्रियकराला मारहाण केली. जेव्हा तरुणीनं मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला, तेव्हा या तरुणीला चाकूनं भोसकलं. घडलेल्या प्रकारानंतर चौघांनी तिथून पळ काढला. या तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथे पोहचेपर्यंत तिने प्राण सोडला होता. या प्रकरणात अजून कुणालाही अटक झालेली नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2015 03:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close