S M L

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jan 19, 2015 01:59 PM IST

 काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

18 जानेवारी :  काश्मीरमध्ये सोपोर जिल्ह्यातल्या एका गावात लपलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.

सोपोर शहराजवळच्या एका गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानां मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सुरक्षा रक्षकांनी गावात 'कोम्बिंग ऑपरेशन' सुरू केले. त्यावेळी एका घरातून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकार्‍याने दिली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2015 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close