S M L

'आप'चे माजी आमदार विनोदकुमार बिन्नींचा भाजपमध्ये प्रवेश

Samruddha Bhambure | Updated On: Jan 18, 2015 08:41 PM IST

'आप'चे माजी आमदार विनोदकुमार बिन्नींचा भाजपमध्ये प्रवेश

18 जानेवारी :  आम आदमी पार्टीशी माजी आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रविवारी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष सतीष उपाध्याय यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाची सदस्यता स्वीकारली. त्यापूर्वी नुकत्याच शाजिया इल्मी आणि किरण बेदी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

गेल्या निवडणुकीत लक्ष्मीनगर मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर आमदार बनलेल्या बिन्नी यांनी केजरीवाल यांच्याशी मतभेद निर्माण झाल्यानंतर आपला रामराम केला होता. पक्षात प्रवेश केल्यानंतर बिन्नी म्हणाले की, मते मिळवण्यासाठी केजरीवाल यांनी लोकांच्या भावनांशी खेळ केला. त्याआधी बिन्नी यांनी शनिवारी सतीष उपाध्याय यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आता बिन्नी यांच्या भाजप प्रवेशामुळे पूर्व दिल्लीतले भाजपचे स्थान बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातं आहे. बिन्नी यांच्यासोबत बसपा आणि काँग्रेसचे इतर काही नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान आप नेत्यांच्या भाजप प्रवेशावर काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लव्हली यांनी चिमटा काढला आहे. आता केजरीवाल कधी भाजपमध्ये प्रवेश करणार असे ते म्हणाले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2015 08:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close