S M L

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी थरूर यांची लवकरच चौकशी

Sachin Salve | Updated On: Jan 19, 2015 03:14 PM IST

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी थरूर यांची लवकरच चौकशी

tharoor_4419 जानेवारी : सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी आता त्यांचे पती शशी थरूर यांची चौकशी होणार आहे अशी माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी दिली. थरूर सध्या दिल्लीत नाही. येत्या 48 तासांत आम्ही त्यांना बोलावू पण तो निर्णय SIT घेईल, असंही बस्सी यांनी स्पष्ट केलंय.

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, या हत्येचं गूढ अजूनही कायम असून रोज नवनवीन खुलासे या प्रकरणी होत आहे. सुनंदा यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला असा खुलासा झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुनंदा यांच्या मृत्यू प्रकरणी सुनंदा याचे पती आणि काँग्रेसचे माजी मंत्री शशी थरूर यांची चौकशी होणार असं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. शशी थरूर यांच्या चौकशीच्या अगोदर त्यांचा नोकर नारायण सिंह, खासगी सचिव अभिनव कुमार, फॅमिली फ्रेंड संजय दिवान, डॉक्टर रजत मोहन आणि ज्या हॉटेलमध्ये सुनंदा यांचा मृत्यू झाला त्या लीला हॉटेलमधील सर्व कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आलीये. आता या प्रकरणी शशी थरूर यांची चौकशी एक ते दोन दिवसांत होणार आहे. शशी थरूर दिल्ली नसल्यामुळे त्यांना बोलवण्यात येणार आहे. थरूर यांनीही पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असं स्पष्ट केलं होतं.आता या प्रकरणी शशी थरूर यांचा काय जबाब नोंदवला जातो हे पाहण्याचं ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2015 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close