S M L

काँग्रेसला धक्का, माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ भाजपमध्ये !

Sachin Salve | Updated On: Jan 19, 2015 05:53 PM IST

काँग्रेसला धक्का, माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ भाजपमध्ये !

krushna tirath319 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाने वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पाठोपाठ काँग्रेसला आज मोठा धक्का बसलाय. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तत्कालिन यूपीए सरकारमध्ये त्या महिला आणि बालविकास मंत्री होत्या.

दिल्लीत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात प्रभात झा, प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्य यांच्या उपस्थित कृष्णा तिरथ भाजपमध्ये सामिल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. आपण काँग्रेस मुक्त भारत आणि महिला, तरुणाईसाठी काम करणार असल्याचं परखड मत तिरथ यांनी मांडलंय. देशभावना लक्षात घेत आपण भाजपमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला असंही त्या म्हणाल्यात. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते अजय माकन दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आप आणि भाजपवर टीका करत होते. त्याचवेळी कृष्णा तिरथ भाजपमध्ये सहभागाबाबत अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू होती. तिरथ यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशी चर्चा सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2015 05:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close