S M L

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भडकलं ट्विटर युद्ध

Samruddha Bhambure | Updated On: Jan 20, 2015 11:50 AM IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भडकलं ट्विटर युद्ध

20 जानेवारी :  दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केल्याने निवडणुक चांगलीचं रंगतदार होत आहे. 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल आणि किरण बेदींमध्ये ट्विटरवर जोरदार जुगलबंदी पाहायला मिळत आहे. अरविंद केजरीवाल यांनी किरण बेदींना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे.

केजरीवालांचे हे आव्हान बेदींनी स्वीकारले आहे. आपण केजरीवाल यांच्यासोबत वादविवाद करायला तयार आहोत, पण ते रस्त्यावर नाही, तर विधानसभेत असं प्रत्युत्तर किरण बेदी यांनी दिलं आहे. तसंच केजरीवालांना वादविवादावर विश्वास ठेवतात, तर आपला कृतीवर विश्वास असल्याचा टोलाही बेदींनी लगावला आहे. तर केजरीवालांनीही यालाही प्रत्युत्तर देत मतदारांना त्यांचे उमेदवार निवडणुकीआधी कळायला पाहिजेत यासाठी लोकांसमोरच वादविवाद व्हायला हवे, असं ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे, तर काँग्रेसचे अजय माकन मात्र या वादविवादाला तयार आहेत. आमच्या तिघाही जणांना मान्य होईल असा निरीक्षक आणि चॅनेल मिळाले तर असा वादविवाद करायला तयार असल्याचं माकन म्हणाले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2015 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close