S M L

दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Jan 21, 2015 02:16 PM IST

 दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल

21  जानेवारी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या तीनही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असलेल्या किरण बेदी यांनी कृष्णानगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे तर 'आप'चे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे तसंच काँग्रेसचे निवडणूक प्रचारप्रमुख अजय माकन यांनीही सदर बाजार मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

केजरीवाल कालच उमेदवारी अर्ज भरणार होते. पण, रोड शोला चांगलीच गर्दी जमल्याने केजरीवाल यांनी ठिकठिकाणी भाषणं सुरू केली. किरण बेदी यांच्यावर टीकाही केली. हे सगळं करत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. त्यामुळं त्यांना अर्जच भरता आला नाही.

दरम्यान, राजधानी दिल्लीचे 49 दिवस मुख्यमंत्रिपद भूषवलेले केजरीवाल झाल्या चुकांची माफी मागत पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कालच केजरीवालांनी किरण बेदींना टीव्ही चॅनलवर खुल्या चर्चेचं आव्हान दिले होते. तर बेदींनी हे आव्हान टोलवलं आहे. 'आपण रत्यावर नाही तर सभागृहात चर्चेसाठी तयार असल्याचं किरण बेदींनी म्हटलं होतं. तर काँग्रेसचे अजय माकन यांनी मात्र केजरीवाल यांचं आव्हान स्वीकारलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2015 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close