S M L

देशभरात हाय अलर्ट ; 'सिद्धिविनायक' हिटलिस्टवर

Samruddha Bhambure | Updated On: Jan 22, 2015 05:01 PM IST

Terrorist-640x480

22 जानेवारी :  मुंबईवर पुन्हा एकदा 26/11 सारखा मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 28 जानेवारीपूर्वी मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचीही माहिती मिळाली आहे.

एकीकडे बराक ओबामांच्या भारतभेटीसाठी सुरक्षायंत्रणा सज्ज होत असली तरी या भेटीदरम्यान भारतावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर मंगळवारी भाविकांची गर्दी होत असते. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असल्यामुळे दहशतवादी सिद्धिविनायक मंदिरात हल्ला घडवून आणू शकतात. पाकिस्तानी अतिरेक्यांच्या 4 संघटना देशात सक्रिय झाल्या असून भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिशाही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून ते समुद्रमार्गे भारतात घुसण्याची शक्यता असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी म्हटलं आहे. यामुळे देशातील सर्व महत्त्वाच्या शहरात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून परदेशी नागरिकांना कडक सुरक्षा पुरवायलाही सुरुवात झालेली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2015 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close