S M L

सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Samruddha Bhambure | Updated On: Jan 22, 2015 03:40 PM IST

सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

22 जानेवारी :   भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून त्यासंबंधी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्याची चर्चा सुरू आहे. भारताचा यशस्वी कॅप्टन गांगुलीचे देशभरात विशेषत: पश्चिम बंगालमध्ये असंख्य चाहते आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा 'दादा'ला पक्षात आणण्याच्या प्रयत्नात आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कडवी टक्कर देण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या असून अनेक महत्त्वाचे मोहरे पक्षात आणण्याची तयारी सुरू आहे. भाजपचे अनेक वरिष्ठ गेल्या अनेक दिवसांपासून गांगुलीच्या संपर्कात असून बोलणी यशस्वी ठरल्यास येत्या काही दिवसांतच त्याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

दरम्यान यापूर्वीही भाजपाने गांगुलीला पक्षात प्रवेशासंबंधी ऑफर दिली होती. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने गांगुलीला तिकीट देऊ केले होते, मात्र तेव्हा त्याने त्यास स्पष्ट नकार दिला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2015 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close