S M L

अडवाणी, बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर, बच्चन यांना पद्म पुरस्कार

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2015 03:37 PM IST

अडवाणी, बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर, बच्चन यांना पद्म पुरस्कार

 

23 जानेवारी : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, योगगुरू बाबा रामदेव, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह 148 जणांचा पद्म पुरस्कारने गौरव करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जात असते. मात्र, पुरस्कारांत कुणा-कुणाची वर्णी लागली याची माहिती सूत्रांकडून आयबीएन नेटवर्कला मिळालीये.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 'भारतरत्न' सन्मान जाहीर करण्यात आलाय. त्यापाठोपाठ आता मोदी सरकारने भाजपच्या पायाभरणी करण्यात मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा 'पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. एकूण 148 जणांची यादी तयार झाली आहे. पण या यादीत दोनच नावं राजकीय नेत्यांची आहे. अडवाणी आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल याचाही पद्म पुरस्कार यादीत समावेश आहे. तसंच योगगुरू बाबा रामदेव, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, अभिनेता अमिताभ बच्चन, बॅडमिंटनपटू पी. व्ही. संधू, कुस्तीपटू सुशील कुमार, कवी आणि गीतकार प्रसून जोशी यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयानं जवळपास 148 जणांची यादी तयार केली आहे. तर 26 जानेवारीला पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

यांना मिळणार पद्म ?

- अमिताभ बच्चन

- लालकृष्ण अडवाणी

- बाबा रामदेव (योगगुरू)

- श्री श्री रविशंकर (अध्यात्मिक गुरू)

- पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटनपटू)

- दिलीप कुमार

- सुशील कुमार (कुस्तीपटू)

- प्रसून जोशी (कवी / गीतकार)

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2015 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close