S M L

बाबा रामदेव-श्री श्री रविशंकर यांनी नाकारले पद्म पुरस्कार

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2015 10:55 PM IST

बाबा रामदेव-श्री श्री रविशंकर यांनी नाकारले पद्म पुरस्कार

24 जानेवारी : भारत सरकारतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कार योगगुरू बाबा रामदेव यांनी नाकारलाय. रामदेव बाबांनी आपण सन्यासी आहोत त्यामुळे आपल्याला पुरस्कार देऊ नये अशी विनंती केलीये. बाबा रामदेव यांच्या पाठोपाठ आता आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनीही पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिलाय.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, योगगुरू बाबा रामदेव, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह 148 जणांचा पद्म पुरस्कारने गौरव करण्यात येणार आहे. पण या पुरस्कारातून योगगुरू बाबा रामदेव, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी माघार घेतलीये. बाबा रामदेव यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून आपल्याला पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली. त्याबद्दल त्यांनी आभार मानले. पण, मी एक सन्यासी आहे, जनसेवा करणे हे माझं कर्तृत्व मानतो. हा पुरस्कार नक्की सन्मानजनक आहे पण, समाजातील इतर प्रतिष्ठीत व्यक्तीला हा पुरस्कार देऊन गौरव करावा अशी विनंती रामदेव यांनी केली. बाबा रामदेव यांनी नकार दिल्यानंतर श्री श्री रविशंकर यांनीही टिवट् करून पुरस्कार देऊ नये अशी विनंती केलीये. समाजात अनेक चांगली लोकं आहेत. माझ्या ऐवजी त्यांच्यापैकी एकाला हा पुरस्कार द्यावा असं मत श्रीश्री रविशंकर यांनी व्यक्त केलंय. भाजप सरकारने पद्म पुरस्कारासाठी एकूण 148 जणांची यादी तयार केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल याचाही पद्म पुरस्कार यादीत समावेश आहे. तसंच ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, अभिनेता अमिताभ बच्चन, बॅडमिंटनपटू पी. व्ही. संधू, कुस्तीपटू सुशील कुमार, कवी आणि गीतकार प्रसून जोशी यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2015 10:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close