S M L

भारत-अमेरिका मैत्री पर्वाअगोदर मागे वळून पाहताना...

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2015 10:29 PM IST

modi-obama_1_0_0_0_0_0_0_0मानस जोशी,मुंबई

24 जानेवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दुसर्‍यांदा भारतभेटीवर येत आहेत. एकाच अध्यक्षांनी दोनदा भारतभेटीवर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीमुळे भारत-अमेरिका संबंध आणखी दृढ हेणार आहेत. स्वातंत्र्यानंतर भारत-अमेेरिका संबंधांमध्ये अनेक चढ उतार आले. यासंबंधीचा हा एक रिपोर्ट

भारत-अमेरिका संबंधात गेल्या काहीवर्षात मैत्रीचं नवं पर्व सुरू झालंय. पण गेली अनेक दशकं दोन्ही देशांच्या संबंधात अनेक चढ उतार आले. त्याला पार्श्वभूमी होती शितयुद्धाची. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ओढा समाजवादी विचारांकडे असल्यानं रशीयाबद्दल त्यांच्या मनात आकर्षण होतं. भारतचा ओढा कम्युनिष्ट रशियाकडे असल्याने अमेरिकेच्या मनात पहिल्यापासूनच संशय होता. त्यामुळे अमेरिका पाकिस्तानकडे आपला आशियातला सहकारी म्हणून पाहू लागला.

आम्ही कुठल्याही गटात समील नाही अशी भारताची अधिकृत भूमिका होती. असं असताना 1971 ला भारताने रशियाशी मैत्री करार केला आणि भारत अमेरिकेचे संबंध ताणले गेले. शीतयुद्ध संपलं आणि हळूहळू या संबंधात सुधारणा झाली. 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे डोळे उघडले आणि परिस्थिती आणखी बदलली. बिल क्लिंटन अध्यक्ष असताना दोन्ही देशांच्या संबंधांना नवा आकार मिळाला.

अफगाणिस्तानमधलं युद्ध संपल्यामुळे पाकिस्तान हा अमेरिकेसाठी बेभरवशाचा गडी ठरत होता. त्यामुळे उपखंडातला एक सशक्त सहकारी म्हणून भारताकडे अमेरिका पाहू लागली. जॉर्ज डब्ल्यु बुश यांच्या कारकीर्दीत नागरी अणुकरारामुळे भारत-अमेरिका संबंध आणखी दृढ झाले. तर बराक ओबामा यांच्या काळात दोन्ही देशातलं सहकार्य आणखी वाढलं. बदलती जागतिक स्थिती आणि भारतात आलेले नवं सरकार यामुळं येणार्‍या काही वर्षात दोन्ही देशांच्या संबंधांना नवं वळण मिळणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2015 10:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close