S M L

आंध्रे प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डींचा मृत्यू

3 सप्टेंबर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डींचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांचा खाजगी सचिव, सुरक्षा अधिकारी आणि दोन पायलट यांचाही मृत्यू झालाय. बुधवारी सकाळपासून मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर बेपत्ता झालं होतं.गुरुवारी सकाळी हवाईदलाच्या विमानानं एका टेकडीवर पडलेल्या या हेलिकॉप्टरचा शोध लावला. हेलिकॉप्टर जळालेल्या अवस्थेत होतं. कर्नुलपासून 70 किलोमीटर पूर्वेला ही टेकडी आहे. हवाईदलानं पॅराट्रुपर्सना या टेकडीवर उतरवून शोध घेतला तेव्हा रेड्डी आणि त्यांच्या सोबतचे चार जण मरण पावल्याचं आढळलं. राजशेखर रेड्डींच्या मृत्यूला गृहमंत्रालयाने अधिकृत रित्या दुजोरा दिला आहे. बुधवारपासून सुरु असलेल्या या शोध मोहिमेत पाच हेलिकॉप्टर्स, सुखोई विमानांसह दोन विमानं यांचा समावेश करण्यात आला. तसंच ग्रे हाऊन्ड, ऑक्टोपस, कोब्रा ही कमांडो पथकंही या शोध मोहिमेत सहभागी झाली होती. आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री के रोसैया यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2009 06:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2009 06:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close