S M L

भारतात पुन्हा येणं हा मोठा सन्मान -ओबामा

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2015 07:08 PM IST

barak_obama_in_india (26)25 जानेवारी : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांचे आज राष्ट्रपती भवनात मोठ्या थाटात स्वागत झालं. यावेळी भारतात पुन्हा एकदा येणे ही माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे, आपण दिलेल्या सन्मानामुळे भारावून गेलोय अशी प्रतिक्रिया ओबामांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

सकाळी ठीक 9 वाजून 40 मिनिटांनी ओबामांचं एअर फोर्स वन हे विमान भारताच्या विमानतळावर उतरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रोटोकॉल तोडून स्वत: ओबामांचं स्वागत केलं. ओबामा आणि मोदींनी यावेळी गळाभेटही घेतली. त्यानंतर बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा, नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती भवनावर पोहचले. त्यावेळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आल्यानंतर ओबामांना भारताच्या तिन्ही सैन्य दलाने गॉड ऑफ ऑनर देऊन सन्मानित केलं. तसंच 21 तोफ्यांची सलामीही दिली. ओबामांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासोबत पुजा ठाकूर या एक विंग कमांडर उपस्थित होत्या. यावेळी मोदींनी भारत सरकारमधील उपस्थित काही प्रमुख नेत्यांची ओळख ओबामांना करून दिली. भारताच्या गणतंत्र दिवसाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणारे बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रध्यक्ष आहेत. भारताकडून दिलेल्या सन्मानाबद्दल आपणं भारावून गेलोय. भारतात पुन्हा एकदा येणे ही माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे अशी भावना ओबामांनी व्यक्त केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2015 07:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close