S M L

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा वारसदार कोण ?

4 सप्टेंबर राजशेखर रेड्डींच्या मृत्यूनंतर आता आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या स्पर्धेत काही नावं आघाडीवर आहेत. कोनीजेट्टी रोझय्या हे राजशेखर रेड्डींच्या सगळ्यात जवळचे नेते मानले जायचे. रेड्डींपेक्षा रोझय्या सोळा वर्षांनी मोठे असले तरी रेड्डींप्रती त्यांनी आपली निष्ठा कायम राखली. एक कर्तबगार अर्थमंत्री असलेल्या रोझय्या यांना रेड्डी परिवारात महत्वाचं स्थान आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून रोसय्या यांचं नाव निश्चित करण्यात आल्याचं निर्णय अत्यंत गुप्तपणे घेण्यात आला होता. दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाला मान्यता दिल्यानंतर एका तासानं मुख्य सचिवांनी ही माहिती जाहीर केली. पण आता रोझय्या यांचच नाव मुख्यमंत्री म्हणून कायम राहिल की काँग्रेस इतरांच्याही नावाचा विचार मुख्यमंत्रीपदासाठी करेल हे थोड्याच दिवसात कळेल. या स्पर्धेत आणखी तीन नावं आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री के. जना रेड्डी दुसरं नाव आहे, केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी आणि तिसरं आंंध्रप्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. श्रीनिवास या चौघांपैकी के. जनारेड्डी यांचं राजशेखर रेड्डी यांच्याशी कधी पटलं नाही, डी श्रीनिवास यांचाही फारसा दबाव नाही तर जयपाल रेड्डी हे अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे या स्पर्धेतही के. रोझय्या सगळ्यात पुढे आहेत. या व्यतिरिक्त कुठलं नाव या स्पर्धेत नाही, कारण रेड्डींचे पुत्र जगनमोहन रेड्डी हे फक्त सदतीस वर्षांचे आहेत. त्यामुळं मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता तशी कमीच आहे. मात्र दोन वर्ष मुख्यमंत्रीपदाची सूत्र रोझय्यांच्या हातात देऊन, त्यानंतर जगनमोहन रेड्डींकडे सत्ता सोपवण्याचा पर्यायही निवडला जाऊ शकतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2009 02:32 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2009 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close