S M L

ओबामांकडून 'अच्छे दिन'ची ग्वाही

Sachin Salve | Updated On: Jan 26, 2015 11:00 PM IST

ओबामांकडून 'अच्छे दिन'ची ग्वाही

obama_52345f26 जानेवारी : भारत आणि अमेरिकेच्या व्यापार वृद्धीसाठी आणखी 'अच्छे दिन' येतील असे संकेत दोन्ही नेत्यांनी दिले. इंडो-युएस बिझिनेस समिटमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी औद्योगिक क्षेत्रासाठी जास्तीत जास्त खुलं वातावरण उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसंच ओबामा यांनी दोन्ही देशांमधला व्यापार आणखी वाढवण्यावर भर दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक भरभराटीसाठी गुड गव्हर्नन्स, व्यापार आणि उद्योगस्नेही धोरणं आणि धोरणांमध्ये सातत्य ही त्रिसुत्री मांडली.

भारत आणि अमेरिकेदरम्यानची महत्वपूर्ण औद्योगिक शिखर परिषद आज दिल्लीत पार पडली. दोन्ही देशांमधल्या आर्थिक संबंधांना चालना देण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून या परिषदेकडे पाहिलं जातंय. या परिषदेमध्ये बराक ओबामा यांनी व्यापार वृद्धीसाठी कटिबद्धता व्यक्त केली. भारतात हरित ऊर्जा क्षेत्रात 2 अब्ज डॉलर गुंतवणूक, अमेरिकेच्या वस्तूंना भारतात निर्यातीसाठी अमेरिका आयात-निर्यात बँक 1 अब्ज डॉलरची आर्थिक मदत पुरवणार अशी महत्वपूर्ण आश्वासनं ओबामांनी दिली. तसंच अमेरिकेच्या ओवरसीस प्राईव्हेट कॉर्पोरेशन भारतातीत ग्रामीण भागात लघु आणि मध्यम उद्योगासाठी एक अब्ज डॉलरची मदत करण्यास तयार आहे असंही ओबामांनी जाहीर केलं. गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार 60 टक्क्यांहुन वाढ होऊन तो 100 अब्ज डॉलरवर पोहचलाय. तर तिथेच चीनसोबत व्यापार हा 560 अब्ज डॉलर इतका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोन्ही देशांच्या व्यापार वृद्धीसाठी पूर्ण मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली. दोन्ही देशातील उद्योजकांना सरकार नियंत्रणेत येणार्‍या अडचणीतून मार्ग मोकळा करून दिला जाईल. खास करून पंतप्रधान कार्यालयाकडून मोठ्या गुंतवणूकींवर नजर ठेवून राहिलं. गुंतवणूकारांच्या समस्येचं निराकरण हे एका प्रशासनासाठी महत्वाची बाब आहे. यासाठी यापुढे गुंतवणूकदारांच्या धोरणांचा विचार करू असं आश्वासन मोदींनी दिलं.

 'ऍट होम'चा विशेष पाहुणचार

या बिझनेस समिटपूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मिशेल आणि बराक ओबामा यांच्यासाठी ऍट होम हा विशेष पाहुणचाराचा कार्यक्रम आयोजित केला. राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनमध्ये यासाठी सुरेख शामियाना उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती यासाठी उपस्थित होत्या. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हेही यावेळी आले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2015 11:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close