S M L

शौर्यपदक विजेते कर्नल एम. एन. राय शहीद

Samruddha Bhambure | Updated On: Jan 28, 2015 09:35 AM IST

शौर्यपदक विजेते कर्नल एम. एन. राय शहीद

28 जानेवारी :  प्रजासत्ताक दिनी शौर्यपदक मिळालेल्या लष्करातील एका अधिकार्‍यासह दोन सुरक्षा अधिकारी आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत मंगळवारी ठार झाले. कर्नल एम. एन. राय, 42 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी मिंडोरा गावात झालेल्या चकमकीत ठार झाले. या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन स्थानिक दहशतवादीही ठार झाले.

प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आलेल्या शौर्यपदक विजेत्यांमध्ये कर्नल राय यांचा समावेश आहे. काश्मीरच्या दक्षिण भागांत गेल्या वर्षी दहशतवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत त्यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात आले होते. कर्नल राय उत्तर प्रदेशच्या गाझीपूरचे रहिवासी असून ते लष्कराच्या 9 गुरखा रायफल्समध्ये अधिकारी होते. सध्या त्यांची नेमणूक 42 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर म्हणून झाली होती.

स्थानिक हिजबुल दहशतवादी आपल्या साथीदारांसह येथे आले असल्याची खबर मिळाल्याने पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सने कारवाई केली. त्यामध्ये दहशतवादी ठार झाले. आदिल खान आणि शिराज दार अशी त्यांची नावे आहेत. सुरक्षारक्षकांनी शस्त्रे आणि स्फोटकांचा साठाही जप्त केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2015 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close