S M L

'एनसीसी'ने मला खूप काही शिकवले- नरेंद्र मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 28, 2015 02:00 PM IST

'एनसीसी'ने मला खूप काही शिकवले- नरेंद्र मोदी

28 जानेवारी :  राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) मला खूप काही शिकवले आहे, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून आज (बुधवार) म्हटलं आहे.

राजधानी दिल्लीत आज एनसीसीच्ये प्रजासत्ताक दिनाच्या कॅम्पची सांगता परेड झाली. या परेडसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सशस्त्र बळांच्या तीनही शाखांनी पंतप्रधानांना मानवंदना दिली. दर वर्षी 1 ते 30 जानेवारी या काळात NCCचा नवी दिल्लीत कॅम्प भरतो. या कॅम्पच्या शेवटच्या दिवशी ही परेड होते. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आपल्या बालपणाच्या अनेक आठवणी जागवल्या.  या शिवाय, मोदींनी ट्विटरवर लहानपणीचे एक फोटोही शेअर केला आहे.

 

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2015 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close