S M L

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपीचं सरकार?, लवकरच घोषणा

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2015 11:16 PM IST

jammu_kashmir_new329 जानेवारी : पीडीपी आणि भाजप लवकरच जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापनेची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसे संकेत दोन्ही पक्षांकडून देण्यात आले आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आज (गुरुवारी) जम्मूमध्ये बैठक घेतली. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हेही जम्मूमध्ये आहेत. तर आपल्याला फार काळ वाट बघावी लागणार नाही, असं पीडीपीचे प्रवक्ते नईम अख्तर यांनीही म्हटलंय.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या 87 जागांसाठी मतमोजणी झाली. बहुमतासाठी 44 जागांचा आकडा गाठणे आवश्यक आहे. पीडीपी 28, भाजप 25, नॅशनल कॉन्फरन्स 15, काँग्रेस 12 आणि अपक्षांनी 5 जागा जिंकल्या आहे. पण एकाही पक्षाला बहुमत गाठता आलं नाही. पण पीडीपी आणि भाजप अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यामुळेच पीडीपी आणि भाजप एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकण्याची दाट शक्यता आहे. पीडीपीच्या 28 आणि भाजपच्या 25 जागा मिळून 53 जागा होता. त्यामुळे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होतो. विशेष म्हणजे पीडीपीच्या नेत्यांनी भाजपला सोबत घेण्यात काहीही गैर नाही असं विधान केलंय. तर आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहे असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2015 11:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close