S M L

नेटवर्क 18 ची 'मीडिया इन्स्टिट्यूट इनिशिएटिव्ह'ची घोषणा

Sachin Salve | Updated On: Jan 30, 2015 07:54 PM IST

नेटवर्क 18 ची 'मीडिया इन्स्टिट्यूट इनिशिएटिव्ह'ची घोषणा

NET_WORK330 जानेवारी : पत्रकारिता क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवणार्‍या नव पत्रकारांना प्रोत्साहान देण्यासाठी 'नेटवर्क 18' समुहाने एक नवी मुहूर्तमेढ रोवली आहे. छत्तीसगड येथील कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालयासोबत 'नेटवर्क 18' ने पहिला'मीडिया इंस्टीट्यूट इनिशिएटिव्ह' एमओयू करार केला आहे. या करारावर मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांच्या उपस्थिती कुलगुरू डॉ.सच्चिदानंद जोशी आणि नेटवर्क 18 चे न्यूज प्रेसिडेंट उमेश उपाध्याय यांनी स्वाक्षरी केलीये.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पत्रकारिता क्षेत्रातील युगपुरूष माखनलाल चतुर्वेदी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सीएनएन आयबीएन आणि आयबीएन सेव्हनने आपली 'मीडिया इन्स्टिट्यूट इनिशिएटिव्ह' (Media Institute Initiative) ची घोषणा केलीये. या मोहिमेअंतर्गत नेटवर्क 18 चे अनुभवी मीडिया कर्मी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. एवढंच नाहीतर नेटवर्क 18 च्या माध्यमातून छत्तीसगड सारखा दुर्गम भागात पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना विविध माध्यमांद्वारे ग्लोबल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नेटवर्क 18 मध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची नामी संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

"नेटवर्क 18 च्या या मोहिमेला पूर्णपणे सहकार्य दिलं जाईल. छत्तीसगडमधील विद्यार्थी कलागुण संपन्न असून त्यांना प्रोत्साहान देण्याची गरज आहे. नेटवर्क 18 च्या मोहिमेमुळे याला बळ मिळेल त्याबद्दल मी खूश आहे", अशी भावना मुख्यमंत्री डॉ.रमन सिंह यांनी व्यक्त केली.

तर नेटवर्क 18 चे न्यूज प्रेसिडेंट उमेश उपाध्याय म्हणाले की, "नेटवर्क 18 च्या या मोहिमेमुळे छत्तीसगडची एक वेगळ ओळख जगाला पाहण्यास मिळेल. एमओयू करार हा देशातील काही निवडक महाविद्यालयासोबत केला जाणार आहे. परदेशातील काही प्रतिष्ठीत शिक्षण संस्थाही यात सहभागी होणार आहे. नेटवर्क 18 हा देशातला सर्वात मोठा न्यूज नेटवर्क आहे. आम्ही दीड कोटी लोकांपर्यंत टीव्हीच्या माध्यमातून आणि 3 कोटी लोकांपर्यंत विविध डिजिटल माध्यमातून पोहचलो आहोत.

नेटवर्क 18 ने करार केल्याबद्दल कुशाभाऊ ठाकरे महाविद्यालयाचे कुलगुरू डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी नेटवर्क 18 समुहाचे आभार मानले.

तर बस्तर भागातील सुकमा सारख्या नक्षलग्रस्त भागातील माहिती दिल्लीत असलेल्या विश्लेषकांपेक्षा इथल्या स्थानिक पत्रकारांना जास्त माहिती असते. आज आधुनिकतेमुळे हे काम आणखी सोपं झालंय. नेटवर्क 18 समुहाने मोठी जबाबदारी उचलली आहे अशी भावना नेटवर्क 18 चे डेप्युटी मॅनेजिंग एडिटर सुमित अवस्थी यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला छत्तीसगड येथील स्थानिक अधिकारी, कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, तसंच स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एमओयूच्या अंतर्गत टनेटवर्क 18' या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप,गेस्ट लेक्चर, प्रशिक्षण शिबिरं, सेमिनार्स आयोजित करणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2015 06:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close