S M L

'आप'ने दिल्लीकरांच्या पाठीत खंजीर खुपसला -मोदी

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2015 09:17 PM IST

narendra_modi_hariyana31 जानेवारी : आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदीही उतरले. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीवर मोदींनी सडकून टीका केली. दिल्लीकरांनी संधी देऊनंही आप आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी केली. तसंच दिल्लीला एक प्रामाणिक सरकार देणार असं आश्वासनंही त्यांनी दिलं.

दिल्लीच्या निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापलाय. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाड्यात उतरून चौफेर तोफ डागली. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला संधी दिली होती. पण आप आणि त्यांचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लाकरांचा विश्वासघात केला. त्यांच्या विश्वासाची पूर्तता करण्यात आप सपशेल अपयशी ठरलंय. केजरीवाल यांनी दिल्लीकारांच्या पाठीत खंजीर खुपसलंय अशी टीका मोदींनी केली. तसंच ज्या पार्टीवर डिपॉजिट जप्त करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे ते दिल्लीत सरकार कसं बनवू शकतं अशी खिल्लीही मोदींनी उडवली.

2022 पर्यंत दिल्लीत झोपड्डपट्‌ट्यात राहणार्‍यांना पक्की घरं देणार, यमुना नदीचा विकास करणार यासाठी आपला आशीर्वाद हवाय असंही मोदी म्हणाले. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यातील केंद्र सरकारच्या यशाचा पाढाही पंतप्रधानांनी वाचला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भारतभेट हे केंद्र सरकारचं मोठं यश आहे. जर ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहुन परत गेले असते तर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असती. त्यावेळी कुणी म्हटलं नसतं निवडणुकीसाठी ओबामांच्या नावाचा वापर केला गेला असे खडेबोलही विरोधकांना सुनावले. तसंच भाजप दिल्लीच्या विकासासाठी कशी कटीबद्ध आहे यावर मोदींनी विशेष भर दिला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2015 09:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close