S M L

किरण बेदी यांच्या प्रचारप्रमुखांचा राजीनामा

Samruddha Bhambure | Updated On: Feb 2, 2015 04:25 PM IST

किरण बेदी यांच्या प्रचारप्रमुखांचा राजीनामा

02 फेब्रुवारी :  दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केवळ 5-6 दिवस बाकी राहिले असताना भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे प्रचारप्रमुख नरेंद्र टंडन यांनी राजीनामा दिला आहे.

भाजपचे सदस्य असलेले आणि बेदी यांच्या प्रचाराची धुरा संभाळणार्‍या टंडन यांनी बेदी यांच्या वागणुकीवर जोरदार आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे. किरण बेदींच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे आपण राजीनामा देत असल्याचे म्हटलं आहे. आपल्याला अनेकवेळा बेदी आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून अशी वागणूक मिळाल्याचेही टंडन यांनी सांगितले. टंडन यांनी आपला राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सोपविला आहे.

गेल्या काही दिवसापासून बेदी ज्याप्रमाणे नेत्यांना, पदाधिकार्‍यांना वागणुक देत आहे त्या वातावरणात मला काम करणे अवघड जात आहे. मी केलेले आरोप कोणतेही सनसनाटी करण्यासाठी केले नसून पक्षाला तसे वाटल्यास त्यांनी मी केलेल्या आरोपांची चौकशी करावी असेही टंडन यांनी म्हटले आहे.

टंडन हे भाजपचे गेल्या 30 वर्षांपासून सदस्य होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2015 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close