S M L

'आप'ला बोगस कंपन्यांकडून लाखोंचा निधी'

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2015 11:26 PM IST

'आप'ला बोगस कंपन्यांकडून लाखोंचा निधी'

kejriwal_aap_delhiदिल्ली (02 फेब्रुवारी): दिल्ली निवडणुकीत आता एक नवा वाद सुरू झालाय. आम आदमी पार्टीला मिळणार्‍या निधीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतोय. विशेष म्हणजे आपचेच माजी कार्यकर्ते हा आरोप करत आहे.

'आप'चा दिल्लीत जोरदार प्रचार सुरू आहे. आपला काही ठिकाणी पाठिंबाही मिळताना दिसतोय. पण या दरम्यान, आता 'आप'वर भ्रष्टाचाराचा आरोप होतोय. आणि हा आरोप दुसरं-तिसरं कोणी नाही तर आपचे माजी कार्यकर्ते गोपाळ गोयल यांनी केलाय. त्यांनी आप व्हॉलेंटिअर ऍक्शन मंचची स्थापना केलीय. या अवामने आपला बोगस कंपन्यांकडून निधी उपलब्ध होतोय, असा आरोप केलाय.

निधी देणार्‍या कंपन्यांचे पत्ते बोगस असल्याचा दावा आवामच्या कार्यकर्त्यांनी केलाय. या पत्त्यांवर या कंपन्यांचं अस्तित्व नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

अवामचे नेमके आरोप काय आहेत ?

कंपनीला एखाद्या अज्ञात स्रोताच्या माध्यमातून पैसे उपलब्ध होतात

त्यानंतर काही दिवसांनी 'आप'ला निधी दिला जातो

आपला या बोगस कंपन्यांकडून चार वेळा 50 लाखांचा निधी उपलब्ध होतो

'आप' हा निधी कायदेशीर असल्याचा दावा करतो.

आपचे विरोधकही असेच आरोप करतायत पण आपने मात्र हे आरोप नाकारले आहे. अवामला जर या आर्थिक घोटाळ्याची आधीपासून कल्पना होती तर अवामने आतापर्यंत याची माहिती का दिली नाही, हा प्रश्न आहेच..याचं उत्तर मिळेल की नाही, ही शंका आहे. पण यामुळे निवडणुकीच्या आधी आणखी एक मुद्दा तापायला सुरुवात झालीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2015 11:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close