S M L

मध्यमवर्गीयांना मिळणार नाही सिलेंडरवर अनुदान ?

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2015 11:47 PM IST

Image img_216932_gas3456_240x180.jpg02 फेब्रुवारी : घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणार्‍या अनुदानाची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. 5 ते 10 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीयांचंही अनुदान रद्द करण्याचा सरकारचा विचार आहे. तसंच विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांना अपात्र ठरवलं जाऊ शक्यता आहे.

केंद्र सरकारने सिलेंडरची मर्यादा वाढवली आणि सिलेंडरवर मिळणारं अनुदानही कमी केलं. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. पण आता आर्थिक निकषावर अनुदानाचा सरकारचा विचार आहे. लोकांची आर्थिक परिस्थिती पाहुन अनुदान द्यावं असा विचार सरकार करत आहे. जर तसं झालं तर मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांना अपात्र ठरवलं शकतं आणि अशा अपात्र नागरिकांचं अनुदान काढून घेण्याचा अर्थमंत्री अरूण जेटली यांचा विचार आहे. याविषयीचा आराखडा बजेटमध्ये मांडला जाण्याची शक्यता आहे. वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त असल्यास अनुदान रद्द होऊ शकतं, तसंच 5 ते 10 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्यांचंही अनुदान रद्द करण्याचा सरकारचा विचार आहे. त्याशिवाय पाईपमधून स्वयंपाकाचा गॅस घेणार्‍यांना आणि खासगी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी करसवलत देण्याचा प्रस्ताव येऊ शकतो. त्यामुळे या बजेटमध्ये काय निर्णय घेतला जातो हे पाहण्याचं ठरेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2015 09:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close