S M L

आता रेल्वेची तिकीट घरपोच मिळाल्यावर द्या पैसे!

Samruddha Bhambure | Updated On: Feb 3, 2015 03:56 PM IST

आता रेल्वेची तिकीट घरपोच मिळाल्यावर द्या पैसे!

03 फेब्रुवारी :  रेल्वे तिकीट बुक करणं आता आणखी सोपं झालं आहे. तुम्ही रेल्वे तिकीट काढून त्याचे पैसे ते तिकीट घरी आल्यावर देऊ शकता. म्हणजेच रेल्वेचं तिकीटही आता 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर मिळणार आहे. आयआरसीटीसीने हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. देशातील 200 शहरांमध्ये ही सुविधा सुरुवातीला उपलब्ध होणार आहे.

ज्यांना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरायचं नाही किंवा ज्या प्रवाशांकडे इंटरनेट बँकींगची सुविधा नाही. त्यांच्यासाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंगला प्रतिसाद वाढतोय. हवी ती वस्तू वेगवेगळ्या साईट्सवरून ऑनलाईन बुक करायची आणि ती वस्तू घरी आल्यावर त्याचे पैसे द्यायचे, म्हणजेच कॅश ऑन डिलिव्हरीला लोकांची चांगली पसंती मिळाली. त्याच धर्तीवर ऑनलाईन तिकीट बुक करा आणि तिकीट घरी पोहोचल्यावर पैसे द्या, अशी ही योजना असल्याचं आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितलं आहे.

प्रवासाच्या पाच दिवस आधी तुम्ही हे तिकीट बुक करू शकता. पण, या सेवेसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे. स्लीपर क्लाससाठी 40 रुपये तर एसी क्लासच्या तिकीटांसाठी 60 रुपये चार्ज द्यावा लागेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2015 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close