S M L

दिल्ली निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या

Sachin Salve | Updated On: Feb 5, 2015 10:33 PM IST

दिल्ली निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या

05 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार थोफा आज संध्याकाळी 5 वाजता थंडावला. आता दोन दिवसांनी येत्या 7 तारखेला मतदान होणार आहे आणि 10 तारखेला मतमोजणी होणार आहे.

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप अध्यक्ष अमित शहांच्या रॅलींचं जेजे कॉलनी, मदनापूर खादर आणि सदर बझारमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसच्याही दोन रॅलीज आयोजित करण्यात आल्या होत्या. तसंच काँग्रेसनेही 2 रोड शो केले होते. काँग्रेसचे नेते अजय माकन आज यांनी आपल्या मतदारसंघ सदर बझारमध्ये प्रचार केला. दिल्लीच्या या निवडणुकांमध्ये भाजपने आपली सगळी ज्येष्ठ नेत्यांची फळी उतरवलीय. पंतप्रधान मोदींनीही या प्रचारासाठी 4 सभा घेतल्या. विशेष म्हणजे भाजपने किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केलंय. त्यामुळे बेदी विरुद्ध केजरीवाल असा सामना रंगलाय. त्यामुळे दिल्लीचे तख्त कोण राखणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2015 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close