S M L

दिग्गजांचं भवितव्य 'ईव्हीएम'मध्ये बंद, उत्स्फूर्त 67 टक्के मतदान

Samruddha Bhambure | Updated On: Feb 7, 2015 09:54 PM IST

दिग्गजांचं भवितव्य 'ईव्हीएम'मध्ये बंद, उत्स्फूर्त 67 टक्के मतदान

delhi election_aap_bjp_congress07 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता 673 उमेदवारांचं भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय. दिल्लीकरांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून नव्या सरकारसाठी 'बोटाला शाई' लावलीये. 70 जागांसाठी 67 टक्के विक्रमी मतदान झालंय.

मागील निवडणुकीत 65 टक्के मतदान झालं होतं. तब्बल 1 कोटी 33 लाखांपेक्षा जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय.

विशेष म्हणजे, दिल्लीत यावेळी तिरंगी लढत होती. पण खरी चुरस भाजप आणि आपमध्येच होती. एक्झिट पोलनुसार आपला सर्वसामान्यांनी कौल दिलाय. मतदान तसं शांततेत पार पडलं. पण आजच्या दिवशीही आरोप प्रत्युत्तरं सुरूच होती.

दिल्ली मतदानाची टक्केवारी

एकूण मतदान- 67 टक्के

मध्य दिल्ली - 68 टक्के

नवी दिल्ली- 64 टक्के

उत्तर दिल्ली- 68 टक्के

ईशान्य दिल्ली- 69 टक्के

वायव्य दिल्ली - 65 टक्के

दक्षिण दिल्ली- 66 टक्के

नैऋत्य दिल्ली- 66 टक्के

दिल्ली विधानसभेसाठी 70 जागांसाठी मतदान होत आहे. भाजप, काँग्रेस आणि आपमधल्या तिरंगी लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अजय माकन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही नवी दिल्ली मतदारसंघातल्या केंद्रावर जाऊन मतदान केलं. तसंच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. या सगळ्या उमेदवारांनी आपलाच विजय होईल असा जरी दावा केला असला तरी आता दिल्लीकर कौल कुणाला देतात याचीच उत्सुकता आहे.

निवडणुकीची पार्श्वभूमी

दिल्लीच्या आखाड्यात भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होतेय. पण खरी चुरस भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये आहे. गेल्या 16 वर्षांपासून भाजप दिल्लीत सत्तेबाहेर आहे. तर काँग्रेसनं 2013 पर्यंत 15 वर्षं सत्ता भोगलीये. गेल्या वर्षी झालेले निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपला 34 जागा मिळाल्या होत्या. तर आम आदमी पार्टीने आपल्या पहिल्याच निवडणुकीत 28 जागा पटकावून दुसरे स्थान पटकावले होते. तर काँग्रेसला अवघ्या 8 च जागा मिळाल्या होत्या. आपने काँग्रेसचा पाठिंबा सरकार स्थापन केले होते. पण आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीसाठी लोकपाल विधेयकाच्या मुद्यावरून सरकार बरखास्त करण्याची घोषणा केली होती. 49 दिवसांच्या आत 'आप'चं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली खरी पण बहुमताचा आकडा सिद्ध न करता आल्यामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राष्ट्रपती राजवटीनंतर दिल्लीत पुन्हा निवडणूक होत असून आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे त्यामुळेच दिल्लीचे तख्त कोण राखणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2015 09:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close