S M L

एक्झिट पोल: दिल्ली पुन्हा 'आप'ची, भाजपचं स्वप्न भंगणार?

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2015 08:19 AM IST

एक्झिट पोल: दिल्ली पुन्हा 'आप'ची, भाजपचं स्वप्न भंगणार?

10 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमदेवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय. दिल्लीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 67 टक्के मतदानाची नोंद झालीये. त्यामुळे आता दिल्लीचे तख्त कोण राखणार ?, अशी चर्चा सुरू झालीये. वेगवेगळे एक्झिट पोल आता जाहीर झाले असून सर्वच पोलमध्ये दिल्ली पुन्हा आपची अर्थात 'आम आदमी'ची होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. नेल्सन सर्व्हे, सिसरो, सी व्होटर्स, डाटा माइनेरिया एक्झिट पोल आणि चाणक्य एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरले असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर भाजप हा दुसर्‍या स्थानावर राहिलं. तर तिसर्‍या स्थानावर काँग्रेस फेकली गेलीये. चाणक्य पोलमध्ये आपला 48 जागा मिळतील तर भाजपला 22 जागा मिळतील काँग्रेसला फक्त 2 जागेवरच समाधान मानावे लागणार आहे.

चाणक्य एक्झिट पोल

भाजप - 22

आप - 48

काँग्रेस -2

नेल्सनचा सर्व्हे

आप - 37 टक्के - 39 जागा

भाजप - 32 टक्के - 28 जागा

काँग्रेस - 13 टक्के - 3 जागा

सिसेरो

आप - 41 टक्के - 43 जागा

भाजप - 37 टक्के - 29 जागा

काँग्रेस - 15 टक्के - 3 ते 5 जागा

सी व्होटर्स

आप - 42 टक्के - 32 ते 39 जागा

भाजप - 40 टक्के - 27 ते 35 जागा

काँग्रेस - 11 टक्के - 2 ते 4 जागा

डाटा माइनेरिया एक्झिट पोल

भाजप-35 जागा

आप -31 जागा

काँग्रेस 4 जागा

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2015 07:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close