S M L

राजकीय परिस्थितीविषयी पंतप्रधानांशी बोललो नाही - मांझी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 8, 2015 08:43 PM IST

राजकीय परिस्थितीविषयी पंतप्रधानांशी बोललो नाही - मांझी

08 फेब्रुवारी :  बिहारमध्ये राजकीय नाट्य सुरू आहे. नितीश कुमार यांच्या समर्थकांनी सभागृहात बहुमत सिद्ध केलं तर मी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होईल, असंही मांझी म्हणाले. पण बिहारच्या आमदारांना धमकावलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या पत्रकार परिषदेआधी मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सत्तेत राहण्यासाठी भाजपच्या पाठिंब्यांविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. पण बिहारच्या राजकीय परिस्थितीविषयी पंतप्रधानांशी बोललो नाही, असं मांझी यांचं म्हणणं आहे.

जेडीयुच्या केंद्रीय नेतृत्वासोबत केलेली बंडाळी बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना चांगलीच भोवली. मांझी यांना आमदारांचा पाठिंबा नाही, असं म्हणत माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जेडीयूच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून मुख्यमंत्रिपदासाठी दावा केला आहे. पण, जीतनराम मांझी मागे हटायला तयार नाही.

मी अजूनही बिहारचा मुख्यमंत्री आहे आणि नितीश कुमार यांना आपलं महत्त्व कमी होईल, याची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते मला बेकायदेशीरपणे हटवू पाहत आहेत, असा आरोप मांझी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये सत्ताधारी जेडीयूला 40 पैकी फक्त 2 जागा मिळाल्या होत्या. या दारुण कामगिरीची जबाबदारी स्वीकारत तेव्हाचे मुख्यमंत्री नितीश कुमार मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले होते. त्यानंतर दलित समाजाचे असलेले जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रिपद मिळालं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2015 06:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close