S M L

स्वीस बँकेत भारतीय खातेदार वाढले, 25 हजार 420 कोटींची माया जमा !

Sachin Salve | Updated On: Feb 9, 2015 03:10 PM IST

स्वीस बँकेत भारतीय खातेदार वाढले, 25 हजार 420 कोटींची माया जमा !

09 फेब्रुवारी : परदेशी स्वीस बँकेत किती भारतीयांनी आपली काळी माया साठवून ठेवली याबद्दल वारंवार खुलासे झाले. पण 2011 च्या तुलनेत काळा पैसाधारकांची संख्या आता दुप्पट झालीये असा गौप्यस्फोट 'इंडियन एक्स्प्रेस'ने केलाय. HSBC बँकेत परदेशी खात्यांमध्ये 1195 भारतीय नागरिकांची खाती आहेत. या खात्यांमध्ये एकूण तब्बल 25 हजार 420 कोटींची माया जमा आहे.

काळा पैशा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने एसआयटीची स्थापन केली असून चौकशी सुरू आहे. स्वीस बँकेनं 2011 साली 628 जणांची नावं भारत सरकारकडे सुपूर्द केली होती. पण आता एचएसबीसी बँकेत भारतीय खातेदारांची संख्या कमी झाली नाहीतर ती दुप्पटीने वाढलीये. नेमकी कुणा-कुणाची खाती आहे ?, यासाठी इंडियन एक्स्प्रेसने 'स्वीसलीक्स'नावाने शोध मोहिम हाती घेतली. तीन महिने चाललेल्या या मोहिमेसाठी वॉशिंग्टन येथील आयसीआयजे आणि पॅरिस मधील 'ला मौंड' या वृतपत्राची साथ घेण्यात आली होती. तीन महिन्यांच्या शोध मोहिमेअंती इंडियन एक्स्प्रेसने आज ऑपरेशन 'स्वीसलीक्स' जाहीर केलं. एचएसबीसी बँकेत 2011 च्या तुलनेत खातेदारांचा आकडा आता 1195 वर पोहचलाय. या खातेदारांच्या यादीत देशातील बडे उद्योगपती, हिरे व्यापारी, राजकारणी आणि अनिवासी भारतीय यांचा समावेश आहे. काही हिरे व्यापारी परदेशात स्थायिक झाले आहे. पण त्यांच्या खात्याचे पत्ते हे मुंबईतील असल्याचा दावाही करण्यात आलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2015 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close