S M L

दिल्लीचं तख्त कोण राखणार ?

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2015 09:01 AM IST

दिल्लीचं तख्त कोण राखणार ?

नवी दिल्ली (10 फेब्रुवारी ): दिल्लीचं तख्त कोण राखणार ?, कोण जिंकणार राजधानीचा आखाडा ?, याची उत्सुक्ता आता शिगेला पोहचलीये. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात होईल आणि दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. पण सर्वच एक्झिट पोलमध्ये दिल्ली 'आम आदमी'ची होईल असा अंदाज व्यक्त केल्यामुळे सगळ्यांचं लक्ष्य निकालाकडे लागलंय. एक्झिट पोल खरे ठरतील की वेगळाच निकाल लागेल हे पाहण्याचं ठरणार आहे.

देशाची राजधानी दिल्ली...मागील निवडणुकीत तब्बल तीन टर्म उपभोगणार्‍या काँग्रेसला जनतेनं घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर नवखा आम आदमी पक्ष काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन सत्तेवर विराजमान झाला खरा पण आपल्याच 'आप'लेपणामुळे अवघ्या 49 दिवसांत सत्तेवरून पायउतारही झाला. सत्तेसाठी कुणी समोर येत नसल्यामुळे दिल्लीकर राष्ट्रपती राजवटीला सामोरे गेले आणि नऊ महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दिल्लीकर निवडणुकीला सामोरं गेले.

लोकसभेत भाजपने मोदी लाटेवर सुवर्ण विजय मिळवण्यामुळे दिल्लीचा तख्त जिंकण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात केजरीवाल यांच्या सहकारी किरण बेदी यांना थेट मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून आखाड्यात उतरवलं. त्यामुळे केजरीवाल विरुद्ध बेदी असा सामनाच रंगला.

तर काँग्रेसने ज्येष्ठ नेते अजय माकन यांच्या धुरा सोपवली. दिल्ली जिंकण्यासाठी तिन्ही पक्षांनी जमीन आसमान एक करून प्रचाराची धुराळं उडवलीये. मतदाराराजानेही 67 टक्के उत्स्फूर्त मतदान करून नव्या सरकारचा फैसला ईव्हीएम मशीनमध्ये बंद केला.

त्यात भरात भर म्हणजे एक्झिट पोल. एक नव्हे दोन नव्हे तर जवळपास सर्वच एक्झिट पोलनी 'आप'ला कौल दिला. एक्झिट पोलमध्ये तंतोतंत खरा ठरणार्‍या चाणक्य पोलनेही 'आप'ला अधिक-वजा करून 48 जागा मिळतील तर भाजपला 22 तर काँग्रेस अवघ्या 2 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय. इतरही पोलने याच सरासरीत कौल दिलाय. त्यामुळे आपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. अरविंद केजरीवाल यांनी तर ट्वीट करून आपल्या कार्यकर्त्यांना रिलॅक्स व्हायलाही सांगितलं. तिकडे अजय माकन सदरबाजार मतदारसंघातून निवडणूक हरले तर ते काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देतील, अशीही शक्यता आहे.

दरम्यान, भाजपच्या गोटात मात्र आज शांतता दिसली. पक्षकार्यालयात फारशी वर्दळ नव्हती. विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर त्याची जबाबदारी आपण स्वीकारू, असं किरण बेदी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे उद्याचा दिवस भारताच्या राजकारणाला वेगळं वळण देणारा ठरणार आहे.

एक्झिट पोलचा अंदाज

चाणक्य एक्झिट पोल

भाजप – 22

आप – 48

काँग्रेस -2

नेल्सनचा सर्व्हे

आप – 37 टक्के – 39 जागा

भाजप – 32 टक्के – 28 जागा

काँग्रेस – 13 टक्के – 3 जागा

सिसेरो

आप – 41 टक्के – 43 जागा

भाजप – 37 टक्के – 29 जागा

काँग्रेस – 15 टक्के – 3 ते 5 जागा

सी व्होटर्स

आप – 42 टक्के – 32 ते 39 जागा

भाजप – 40 टक्के – 27 ते 35 जागा

काँग्रेस – 11 टक्के – 2 ते 4 जागा

डाटा माइनेरिया एक्झिट पोल

भाजप-35 जागा

आप -31 जागा

काँग्रेस 4 जागा

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2015 08:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close