S M L

दिल्ली विधानसभा निकालाचे दिवसभरातील अपडेटस्

Samruddha Bhambure | Updated On: Feb 10, 2015 09:54 PM IST

दिल्ली विधानसभा निकालाचे दिवसभरातील अपडेटस्

kejriwal_win UPDATE 

- शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडूनच दाखवावं - राष्ट्रवादी

- शिवसेनेची फक्त दबावासाठी नाटकं - राष्ट्रवादी

- शिवसेना-भाजप युती तुटली तर महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका - राष्ट्रवादी

- निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी तयार - नवाब मलिक, राष्ट्रवादी

 

=================================================================================

मोदींवर टीका करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी -आशिष शेलार

मोदीजींवर टीका करेल ते आम्ही सहन करणार नाही -आशिष शेलार

जे मोदींवर टीका करतील त्यांनी सत्तेत आमच्यासोबत राहू नये हे भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याचं मत आहे- आशिष शेलार

सत्ता सोडा आणि टीका करा -आशिष शेलार

मोदींवर टीका कदापीही मान्य नाही - शेलार

दिल्लीची चिंता करण्यापेक्षा उद्धव यांनी स्थानिक निवडणुकीची चिंता करावी -आशिष शेलार

नरेंद्र मोदींवर टीका करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावं - आशिष शेलार

जे लाटा निर्माण करतात ते सुनामी निर्माण करू शकतात -रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

ज्यांच्याकडे लाटा नाहीत आणि त्सुनामीही नाही त्यांनी बोलू नये -रावसाहेब दानवे

================================================================================

दिल्लीचा पराभवाबाबत अण्णांच्या विधानाशी सहमत -उद्धव ठाकरे

 निकालाचा अर्थ ज्याला हवा त्यांनी तसा घ्यावा - उद्धव ठाकरे

देशातली जनता अस्वस्थ आहे. म्हणून दिल्लीत लोकसभेपेक्षा उलटा निकाल दिला -उद्धव ठाकरे

जनतेला गृहित धरू नये, हा सर्व राजकारण्यांसाठी धडा - उद्धव ठाकरे

लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते हे दिल्लीकरांनी दाखवून दिलं -उद्धव ठाकरे

अरविंद केजरीवालांचं फोन करून केलं अभिनंदन -उद्धव ठाकरे

 दिल्लीतल्या जनतेचं कौतुक करावं तेवढं थोडंच -उद्धव ठाकरे

==================================================================================

कदाचित हे माझं शेवटचं भाषण असू शकतं -किरण बेदी

भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी कृष्णानगरमधून पराभूत

कृष्णानगरमधून पराभव आपच्या एस.के. बग्गा यांनी केला पराभव

किरण बेदी 1150 मतांनी पराभव

माझ्यावर टाकलेला विश्वास मी पूर्ण करू शकले नाही, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते-किरण बेदी

कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले -किरण बेदी

दिल्लीत गरीब आणि श्रीमंतांमध्ये मोठी दरी -किरण बेदी

भाजपने संधी दिली त्याबद्दल मी आभारी - किरण बेदी

केजरीवाल सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात -किरण बेदी

दिल्लीला जागतिक दर्जाचं शहर बनवावं - किरण बेदी

अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन,त्यांना पूर्ण मार्क्स - किरण बेदी

अरविंद केजरीवाल यांनी पाच वर्षांपासून मेहनत केलीय - किरण

अरविंद केजरीवाल यांनी आपली आश्वासनं पूर्ण करावी - किरण बेदी

kiran bedi 343नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल विजयी

सोनिया गांधींनी केलं केजरीवालांचं अभिनंदन

अनपेक्षित पराभव आहे, केंद्र सरकार नव्या सरकारला सहकार्य करेल - दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतिश उपाध्याय

केजरीवालांचं अभिनंदन - सतिश उपाध्याय

आम्ही आत्मपरिक्षण करणार नैतिक जबाबदारी मी स्विकारतो - सतिश उपाध्याय

sonia-and-rahul_350_080513010121

राहुल गांधींनी केलं अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन

जनतेचा निर्णय मान्य आहे - राहुल गांधी

दिल्लीच्या जनतेनं त्यांना निवडलंय, जनतेच्या निर्णयाला आम्ही आदर करतो- राहुल गांधी

=============================================================================

निकाल अदभूत असाच आहे - केजरीवाल

हा ऐतिहासिक विजय आहे - अरविंद केजरीवाल

काँग्रेसचा पराभव हा त्यांच्याच अहंकारामुळे - अरविंद केजरीवाल

अहंकार बाळगू नका, काँग्रेस आणि भाजपचं जे झालं तेच आपलं होईल -अरविंद केजरीवाल

केजरीवाल यांनी आपल्या पत्नी, वडिलांचे मानले आभार

पत्नीच्या पाठिंब्यामुळे इथंवर पोहचू शकलो - केजरीवाल

कुटुंबाचा पाठिंबा असल्यानंच हे काम करू शकलो - केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना करून दिली आपल्या कुटुंबियांची ओळख

==================================================================================

आम्हाला जनतेचा कौल मान्य, नवीन सरकारला पूर्ण सहकार्य करू - व्यंकय्या नायडू

किरण बेदींनी ट्विटरद्वारे अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले, केजरीवाल यांनी दिल्लीला नवीन उंचीवर न्यावे - बेदी

दिल्लीकरांची भावना आम्ही समजू शकलो नाही, आम्ही पराभवाची जबाबदारी स्विकारतो- सतिश उपाध्याय, दिल्ली भाजपचे अध्यक्ष

================================================================================

अण्णांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

अरविंद बुद्धीमान, त्याला सरकार कसं चालवायचं हे माहित आहे - अण्णा हजारे

भाजपनं विश्वास गमावलाय - अण्णा हजारे

मी शपथविधीला जाणार नाही -अण्णा हजारे

मात्र माझ्या शुभेच्छा आहे -अण्णा हजारे

सर्व पक्षातल्या चांगल्या लोकांनी काम करावं - अण्णा हजारे

भाजपचा पराभव का झाला ?, भाजपची विश्वासार्हता गमावलीये-अण्णा हजारे

भाजपने आश्वासनांचं पालन केलं नाही -अण्णा हजारे

अरविंद केजरीवाल चांगला माणूस- अण्णा हजारे

आंदोलनाचा विसर पडू देऊ नका - अण्णा हजारे

केजरीवाल यांनी आधी झालेल्या चुका टाळाव्यात साधेपणानं काम करावं -अण्णा हजारे

किरण बेदी यांचा दोष नाही -अण्णा हजारे

जनतेनं कौल दिलाय,जनसंसद सर्वोच्च आहे - अण्णा हजारे

================================================================================

नवी दिल्लीत - काँग्रेस मुख्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी 'प्रियांका लाओ, देश बचाओ'

दिल्लीत काँग्रेसचा सुपडा साफ, भोपळाही फोडला नाही

================================================================================

आपला 52.8 टक्के

भाजपला 33.4 टक्के

तर काँग्रेसला 9.5 टक्के मतं

किरण बेदी पिछाडीवर

अजय माकन पिछाडीवर

दिल्लीत आपची लाट

दिल्लीत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण

भाजपची विजय घौडदौड आपनं रोखली

लोकसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर दिल्लीत भाजपला दणका

किरण बेदी कृष्णानगरमधून पिछाडीवर

भाजपने केलं केजरीवाल यांचे अभिनंदन

आपची 35 जागांवर आघाडीवर

आताच मतमोजणी सुरू झालीये, थोडं थांबा वाट पाहा -अजय माकन

मतमोजणी पूर्ण होईपर्यंत वाट बघा, ही एक मॅच आहे कुणीतरी एक जण जिंकणारच -किरण बेदी

================================================================================

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2015 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close