S M L

असा जिंकला 'आम आदमी' !

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2015 09:25 AM IST

असा जिंकला 'आम आदमी' !

10 फेब्रुवारी : एका वर्षांत आप पुन्हा दिल्लीत एवढा मोठा विजय मिळवेलं असं कुणालाही वाटलं नव्हतं पण, गेल्या सहा महिन्यात आम आदमी पक्षानं असं काय केलं की, दिल्लीकरांनी पुन्हा त्यांच्या हाती सत्ता दिली. काय आहे आम आदमी पार्टीचा विजयी फॉर्म्युला ?,याबद्दलचा हा रिपोर्ट

14 फेब्रुवारी 2014 रोजी केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...हा राजीनामा केजरीवाल यांना चांगलाच महाग पडला. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आम आदमी पक्षाला आला. प्रचारा दरम्यान, केजरीवाल यांना जनतेच्या रोषाला सामोर जावं लागलं. केजरीवाल यांच्यावर अनेक वेळा हल्ले झाले. पण या सगळ्यांवर मात करत 'आप'नं ऐतिहासिक विजय नोंदवत दिल्ली सर केली. काय आहेत आपच्या या विजयाची कारणं....मुख्य कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर केजरीवाल आणि कार्यकर्ते स्वस्त बसले नव्हते.दिल्लीच्या कानाकोपर्‍यात आपचे कार्यकर्ते फिरत होते. झालेल्या चुकांची माफी मागत होते.

राजीनामा काय दिला? हे दिल्लीला पटवून देण्याचं काम आपचे कार्यकर्ते करत होते. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे 'आप'चा अजेंडा सामान्य दिल्लीकर होता. त्यांनी मोदी किंवा किरण बेदींना टार्गेट न करता आपला अजेंडा राबवला.

आपच्या विजयाचं श्रेय जानकार त्यांच्या संघटनेलाही देतात. तर दुसरीकडे अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यातला वाढता अहंकारही, आपच्या पथ्यावर पडला. 49 दिवसांच्या सरकारनंतर पुन्हा एकदा दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल आणि आपला पसंती दिलीये. तेही पाक्षवी बहुमतासह...आता बघायला हवं पुढच्या पाच वर्षांत अरविंद केजरीवाल दिल्लीकरांच्या अपेक्षा पूर्ण करतात का?

==================================================================================

संबंधित बातम्या

दिल्लीत ‘आप’ची त्सुनामी, भाजप भुईसपाट

भाजपच्या पराभवाची 10 कारणं !

 दिल्ली विधानसभा निकालाचे दिवसभरातील अपडेटस्

 विजय अदभूत, पण अहंकार बाळगू नका -केजरीवाल

मोदींकडून केजरीवालांचं अभिनंदन,’चाय पे चर्चे’चं दिलं आमंत्रणकाँग्रेसचा सुपडा साफ, 63 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2015 10:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close