S M L

भाजपच्या पराभवाची 10 कारणं !

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2015 10:17 PM IST

भाजपच्या पराभवाची 10 कारणं !

bedi and modi 44410 जानेवारी : लोकसभेसह वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकीत यश मिळवल्यानं चौफेर उधळलेला भाजपचा वारू दिल्लीत आम आदमी पक्षानं रोखला. भाजपच्या या गर्वहरणाला आम आदमी पक्षासोबतच भाजपच्याच अनेक चुका कारणीभूत ठरल्या. किरण बेदींचा पक्षप्रवेश, दुखावलेले

स्थानिक नेते, फसलेला प्रचार आणि कार्यकर्त्यांकडे झालेलं दुर्लक्ष आणि अतिआत्मविश्वास अशी अनेक कारण या पराभवाला कारणीभूत ठरली.

चूक क्रमांक 1 - किरण बेदींचा पक्षप्रवेश

ऐन निवडणुकीच्या तोंडावर किरण बेदी यांना भाजपनं थेट मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून आणलं. यामुळे वर्षानुवर्ष पक्षकार्य करणारे नेते आणि कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले. त्यात किरण बेदींच्या स्वभावामुळेही ही अस्वस्थता अधिक वाढली. बेदींनी घेतलेल्या पहिल्याच सभेत त्यांनी पक्षाच्या खासदारांची शाळाच घेतली. "आता मी तुमची नेता आहे, मी सांगेन ते ऐकायचं," असं त्यांनी जाहीरपणे सुनावलं. बेदींच्या वक्तव्यांमुळे धास्तावलेलल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बेदींना मोजक्या मतदारसंघांमध्येच फिरवलं.

चूक क्रमांक 2 - प्रचार फसला

आम आदमी पक्षाने नोव्हेंबरमध्येच प्रचार सुरू केला होता. तर भाजपनं निवडणूक जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी प्रचार सुरू केला. पंतप्रधानांनी या सभेत अरविंद केजरीवाल यांना थेट लक्ष्य केलं. त्यांना नक्षलवादी म्हटलं. तेही मतदारांना रुचलं नाही. संपूर्ण प्रचारात केजरीवाल यांच्यावर वैयक्तिक टीका झाली. त्यांच्या जातीला लक्ष्य करण्यात आलं. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदींनी आपलं संपूर्ण कॅबिनेट, खासदार, मुख्यमंत्री, अनेक स्टार अशी फौजच प्रचार मैदानात उतरवली. त्यामुळे,एकीकडे एकटे केजरीवाल आणि दुसरीकडे संपूर्ण सरकार, असं चित्र निर्माण झालं. त्यामुळे सहानुभूती अर्थातच केजरीवालांच्या बाजूनं गेली.

चूक क्रमांक 3 - भाजप नेत्यांची वक्तव्यं भोवली

दिल्लीतल्या प्रचारात भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमुळे भाजपचीच गोची झाली. मंत्री साध्वी निरंजना ज्योतींचं रामजादे वक्तव्य, चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन, मुलींनी पँट घालू नये, लव जिहाद, घरवापसी अशा सगळ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे विकासाच्या मुद्द्यावरून भाजपच्या जवळ गेलेला तरुण मतदार पुन्हा दूर गेला.

चूक क्रमांक 4 - अवामचा निरर्थक वाद

आम आदमी पक्षावर देणग्यांवरून आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप झाला. आपमधून बाहेर पडलेल्या लोकांनी हा आरोप केला. पण, जर

आर्थिक गैरव्यवहार होत असेल तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार सत्तेत आल्याने भाजपकडे होते. पण, भाजपनं कारवाई करण्याऐवजी फक्त आरोपच केले. त्यातच अवामचा फोलपणा स्पष्ट झाला.

चूक क्रमांक 5 - शाही इमामांचा पाठिंबा

दिल्लीच्या शाही इमामांनी आपला पाठिंबा दिला. त्यामुळे हिंदू मतांचं ध्रुवीकरण होईल, असा भाजपचा अंदाज होता. पण, आपनं हा पाठिंबा नाकारल्या हिंदू मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा भाजपचा डाव फसला.

भाजपच्या चुकांची यादी इथेच संपत नाही...

6 - किरण बेदींनी केजरीवालांनी दिलेलं जाहीर चर्चेचं आव्हान धुडकावलं.

7 - बंडाळी रोखण्यासाठी अगदी शेवटच्या दिवशी भाजपनं उमेदवार जाहीर केले. त्यामुळे मतदारांना भाजपचे उमेदवार कोण, हे मतदारांना कळलंच नाही.

8 - कृष्णा तीरथ, विनोद कुमार बिन्नी यासारख्या बाहेरच्या नेत्यांची एंट्री

9 - स्थानिक नेत्यांना डावलून परराज्यातल्या नेत्यांवर भाजपनं दाखवलेला विश्वास. त्यामुळे स्थानिक नेते दुखावले.

10 - भाजपने जाहिरात बाजीत थेट केजरीवाल यांच्यावर निशाना साधला. मुलांच्या खोट्या शपथा खाणार्‍यांना सत्ता कशी देणार ?, अशी वैयक्तिक टीका करण्यात आली.

अतिआत्मविश्वास भाजपला नडला आणि भाजपचं गर्वहरण झालं, असाच निष्कर्ष या निवडणूक निकालांवर काढता येईल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2015 10:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close