S M L

अखेर उद्या केजरीवाल आणि मोदींची भेट होणार !

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2015 05:49 PM IST

अखेर उद्या केजरीवाल आणि मोदींची भेट होणार !

11 फेब्रुवारी : मागील वर्षी लोकसभेच्या आखाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नव्हते. पण आता चित्र बदलं असून दिल्लीचे भावी मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल आता उद्या गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. खुद्द पंतप्रधानांनीच केजरीवाल यांना भेटीचं आमंत्रण दिलंय.

अभूतपूर्व यशानंतर दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता उत्साहानं कामाला लागले आहेत. केजरीवाल यांनी आज (बुधवारी) गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतलीय. त्याअगोदर त्यांनी सकाळी नगरविकास-मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.दिल्ली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीने अनेक पायाभूत सुविधांचं आश्वासन दिलं होतं. त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली सरकारला केंद्र सरकारचा सहयोग लागणार आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या आखाड्यात केजरीवाल यांनी मोदींच्या विरोधात दंड थोपडले होते. वाराणसीत मोदींच्या विरोधात केजरीवालांनी निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी मोदी लाटेमुळे केजरीवाल यांना पराभव पचवावा लागला. आता वर्षभरानंतर दिल्लीत 'आप'ने मोदी लाट परतवून लावून हिशेबाची परतफेड केली. आता उद्या दोन्ही पक्षाचे नेते पंतप्रधान आणि मुख्यमंत्री म्हणून भेट घेणार आहे. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते हे याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2015 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close