S M L

'मोदींऐवजी आता भारतमातेचं मंदिर उभारणार'

Samruddha Bhambure | Updated On: Feb 12, 2015 11:22 AM IST

'मोदींऐवजी आता भारतमातेचं मंदिर उभारणार'

Modi Mandi with teittes

12 फेब्रुवारी : गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बांधलेल्या मंदिराबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मोदी यांनी याबाबत आज (गुरूवारी) ट्विटरवरून नाराजी व्यक्त करत हा प्रकार भारताच्या संस्कृतीविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोदींच्या या नाराजीनंतर मोदीभक्तांनी माघार घेतली आहे. मोदींच्या मंदिराऐवजी आता या ठिकाणी भारत मातेचे मंदिर बांधणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

मंदिर उभारल्याचे बातमी पाहिल्यावर मला धक्का बसला. या प्रकारामुळे मी अत्यंत दु:खी झालो आहे. ज्यांनी हे मंदिर बांधले आहे त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी असे काही करू नये. हा प्रकार भारतीय परंपरेच्या विरोधात असून आपली संस्कृती अशाप्रकारे मंदिर बांधण्याची शिकवण देत नसल्याचे त्यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे. तुमच्याकडे जर इतकाच वेळ आणि पैसा असेल तर त्याचा उपयोग स्वच्छ भारत अभियानाच्या सफलतेसाठी करावा, असा सल्लाही पंतप्रधान मोदींनी मंदिर उभारणार्‍या कार्यकर्त्याना दिला आहे.

मंदिरातील मोदींच्या मुर्तीच्या गळ्यात भाजपचे उपरणे आहे. मंदिराच्या कळसावर भाजपचे गोल फिरणारे कमळ आहे. लाखो रुपये खर्जून हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराचे 15 फेब्रुवारीला उद्घाटन होणार होतं. त्यापूर्वीच मोदींनी नाराजी व्यक्त केल्याने आता तिथे भारत मातेचं मंदिर उभारण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2015 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close