S M L

अण्णा पुन्हा जंतर-मंतरवर, मोदी सरकारविरोधात लाक्षणिक उपोषण

Sachin Salve | Updated On: Feb 12, 2015 08:49 PM IST

anna on lokpal12 फेब्रुवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार पुकारलाय. केंद्र सरकारनं भूसंपादन कायद्यात केलेल्या सुधारणांच्या विरोधात अण्णा हजारे नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणार आहेत.

सुधारित भूसंपादन कायदा शेतकर्‍यांच्या विरोधात आहे, तो अंमलात आणला तर देशातली सामान्य जनता भरडली जाईल, शेतकरी उद्‌ध्वस्त होतील आणि परदेशी कंपन्या, तसंच कॉर्पोरेट लॉबीचा फायदा होईल असा आक्षेप अण्णांनी घेतलाय.

याविरोधात जनजागृती करण्यासाठी 24 फेब्रुवारीला एक दिवसांचं लाक्षणिक उपोषण करणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2015 08:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close