S M L

अखेर 'मोदी मंदिर' तोडलं

Sachin Salve | Updated On: Feb 12, 2015 11:56 PM IST

अखेर 'मोदी मंदिर' तोडलं

12 फेब्रुवारी : कार्यकर्ते काय करू शकता याचा नेम नाही. याचाच अनुभव खुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदींना आला. कार्यकर्त्यांनी चक्क नरेंद्र मोदी यांचं मंदिरच उभारलं. पण कार्यकर्त्यांच्या या पराक्रमामुळे मोदी चांगलेच खवळले. मोदी यांच्या नाराजीनंतर अखेर हे मंदिर तोडण्यात आलंय.

गुजरातमधील राजकोट इथं भाजपच्या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिरच बांधण्यात आलं होतं. नरेंद्र मोदींचं मंदिर बांधण्यात आलं ही बातमी देशभरात वार्‍यासारखी पसरली. मंदिरात चक्क मोदींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. 'कळस' म्हणजे मंदिराच्या कळसावर भाजपचे चिन्ह कमळ हे 'फिरते कमळ' लावण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून या मंदिराचे काम सुरू होते. या मंदिरासाठी लाखो रुपये खर्च करण्यातही आले. एवढंच नाहीतर या मंदिराचं 15 फेब्रुवारीला उद्घाटन सोहळाही आयोजित कऱण्यात आला होता. पण कार्यकर्त्यांचा हा पराक्रम मोदींच्या कानी पडला. मोदी यांनी याबाबत ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली. हा प्रकार भारताच्या संस्कृतीविरोधात असल्याचं सांगत कार्यकर्त्यांना बजावलं. काम करायचं असले तर स्वच्छता भारत मोहिमेला हातभार लावा असा सल्लाही मोदींनी दिला. खुद्द पंतप्रधान मोदी नाराज झाल्यामुळे अखेर हे मंदिर तोडण्यात आलंय. राज्यसरकारच्या परवानगीशिवाय सरकारच्या जागेवर हे मंदिर उभारल्याचं सांगत प्रशासनानं मंदिर पाडलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2015 11:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close