S M L

बंगळुरू-एर्नाकुलम एक्स्प्रेसला अपघात; 8 प्रवाशांचा मृत्यू , 60 जखमी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 13, 2015 05:04 PM IST

बंगळुरू-एर्नाकुलम एक्स्प्रेसला अपघात; 8 प्रवाशांचा मृत्यू , 60 जखमी

13 फेब्रुवारी : बंगळुरु-एर्नाकुलम एक्स्प्रेसचे 9 डब्बे रुळावरून घसरल्याची घटना आज (शुक्रवारी)सकाळी पावणे आठच्या सुमारास एनेकलजवळ घडली. या अपघातात  8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 50 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल आलं आहे. कर्नाटन सरकारच्या 6 ऍम्ब्युलन्स तसंच एनडीआरएफच्या दोन टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घसरलेले डबे आता बाजूला करण्याचं आणि त्यात अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू बंगळुरूकडे रवाना झाले आहे. ते घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

रेल्वेचे हेल्पलाइन क्रमांक : 09731666751 आणि 080 22371166

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2015 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close