S M L

पेट्रोल 82 तर डिझेल 61 पैशांनी महागले

Sachin Salve | Updated On: Feb 15, 2015 09:14 PM IST

petrol_3415 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दराला लागलेली कपातीची 'गळती' आता थांबलीये. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा एकदा इंधन दरात बदल झालाय. पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झालीय. पेट्रोलदरात 82 पैशांची तर डिझेलच्या दरात 61 पैशांची वाढ झाली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाचे दर गडगडल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. अलीकडे पुन्हा आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे असं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलंय. नऊ वेळा पेट्रोलच्या दरात आणि पाच वेळा डिझेलच्या दरात घट झाल्यानंतर पहिल्यांदाच इंधन दरात वाढ झालीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2015 09:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close