S M L

मोदींचा कोट्यवधीचा सूट 'गंगेला मिळाला' !

Sachin Salve | Updated On: Feb 19, 2015 10:49 PM IST

मोदींचा कोट्यवधीचा सूट 'गंगेला मिळाला' !

रिना भारद्वाज, नवी दिल्ली

19 फेब्रुवारी : सूरतमध्ये आज दुसर्‍या दिवशीही पंतप्रधान मोदींच्या लाखमोलाच्या सूटाचीच चर्चा होती. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतात आले त्यावेळी मोदींनी 'नरेंद्र दामोदरदास मोदी' अशी अक्षरं असलेला सूट घातला होता. त्यावर चहूबाजूंनी टीका झाली. त्यानंतर पंतप्रधानांनी त्या सूटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावातून आलेला पैसा गंगेच्या स्वच्छतेसाठी वापरला जाणार आहे. आज दुसर्‍या दिवशी जवळपास दीड कोटी रुपयांपर्यंत बोली पोहचली आहे.

नरेंद्र दामोदर मोदी.. असं लिहिलेल्या पट्‌ट्या परिधान केल्या होत्या खुद्द नरेंद्र दामोदर मोदींनी. तेही अमेरिकेच्या अध्यक्षाचं स्वागत करताना. यावर अनेकांनी चर्चा केली, वाद केले आणि सणकून टीकाही केली.

खासगीत बोलताना अनेक भाजपचे कार्यकर्तेही कबूल करतात की, या सुटाची किंमत..सांगितलेल्या किमतींपेक्षा बरीच जास्त आहे. आता या सुटाचा सुरतमध्ये लिलाव होतोय आणि आतापर्यंत 1 कोटी रुपयांची बोली लावली गेलीये.

हा सूट...पंतप्रधानांना मिळालेल्या एकूण 455 वस्तूंपैकी आहे. ज्यांचा लिलाल 3 दिवस चालणार आहे. यातून मिळणारे पैसे जरी गंगेच्या स्वच्छतेसाठी जाणार असले, तरी ही फक्त सारवासारव आहे, असं विरोधक म्हणतायत.

मोदींच्या सुटामुळे सोशल मीडियावरही वाद पेटलाय. मोदींमुळे असो वा विरोधकांच्या टीकेमुळे..या सुटामुळे गंगेच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये मिळणार, हे निश्चित.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2015 10:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close