S M L

योगसाधनेमुळे बलात्काराचं प्रमाण कमी होईल -जोशी

Sachin Salve | Updated On: Feb 23, 2015 12:54 PM IST

योगसाधनेमुळे बलात्काराचं प्रमाण कमी होईल -जोशी

murali manohar joshi23 फेब्रुवारी : योगसाधनेमुळे देशातलं बलात्काराचं प्रमाण कमी होईल असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

योगसाधनेमुळे बलात्कार अजिबात होणार नाहीत, असं नाही पण त्याचं प्रमाण नक्की कमी होईल अशी पुष्टीही त्यांनी जोडलीय.

योगाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष एका नव्या विचाराने जगायला शिकतील. त्यांचा शरीराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. निसर्गाने शरीराची निर्मिती काहीतरी चांगलं काम करण्यासाठी केली आहे, असा विचार ते करायला लागतील, असंही जोशी म्हणाले आहे. आता या वक्तव्याचे आणखी काय पडसाद उमटतात हे पाहावं लागेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2015 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close