S M L

धर्मपरिवर्तन हाच मदर तेरेसांच्या कामाचा होता मुख्य हेतू -भागवत

Sachin Salve | Updated On: Feb 24, 2015 02:22 PM IST

धर्मपरिवर्तन हाच मदर तेरेसांच्या कामाचा होता मुख्य हेतू -भागवत

24 फेब्रुवारी : धर्मपरिवर्तन हाच तेरेसांच्या कामाचा खरा हेतू होता, असं वादग्रस्त वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. त्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. मदर तेरेसा यांचं कार्य उत्तम होतं. पण ज्यांची सेवा केली जायची त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सांगितलं जायचं, असं वक्तव्य भागवत यांनी केलंय. ते जयपूरमध्ये बोलत होते.

भागवत यांच्या वक्तव्यावरून खळबळ उडाल्यानंतर संघाने ते त्यांचं वैयक्तिक मत नसून एका व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. भागवत यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केलीये. भागवत यांनी तेरेसा यांच्या जनसेवाचा आदर राखला पाहिजे असा सल्लावजा टोला काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी लगावलाय. तर मी तेरेसा यांच्यासोबत काही महिने कामं केलंय. त्या एक पवित्र आत्मा आहे असं मत आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडलंय.गोरगरिबांसाठी आपलं आयुष्य वेचणार्‍या मदर तेरेसा यांच्यावर पहिल्यांदा अशा प्रकारे टीका झालीये. त्यामुळे त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2015 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close