S M L

सरकारला विरोधाकांचा धसका, भूसंपादन कायद्यात बदलाची शक्यता

Sachin Salve | Updated On: Feb 24, 2015 09:51 AM IST

140921164627-modi-interview-01-story-top24 फेब्रुवारी : केंद्र सरकार आज बहुचर्चित भूसंपादन विधेयक लोकसभेत मांडण्याची शक्यता आहे. यात बरेच मोठे बदल करण्यात आले आहेत, असं कळतंय. नवी दिल्लीमध्ये झालेल्या उच्चरस्तरीय बैठकीमध्ये भूसंपादनसाठी पंचायतीची परवानगी अत्यावश्यक करणार्‍या मुद्द्यांचा अंतर्भाव करण्यात यावा याविषयी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

मोदी सरकार या कायद्यातल्या सुधारणांमुळे अडचणीत आलंय. एकीकडे विरोधक आणि दुसरीकडे अण्णा हजारेंचं जंतम-मंतरवरचं आंदोलन अशा दुहेरी कोंडीत सरकार सापडलंय. त्यामुळे आता बजेट अधिवेशन सुरळीत पार पडावं म्हणून केंद्र सरकार या तरतुदी करून काळजी घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2015 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close