S M L

अण्णा-केजरीवाल एकत्र आले, मोदी सरकार बरसले !

Sachin Salve | Updated On: Feb 24, 2015 05:19 PM IST

अण्णा-केजरीवाल एकत्र आले, मोदी सरकार बरसले !

24 फेब्रुवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात आज अण्णांचे शिष्य अर्थात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहभागी झाले. यावेळी केजरीवाल यांनी अण्णांना पाठिंबा देत मोदी सरकार सडकून टीका केली. काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीच फरक नाही, शेतकर्‍यांचं नुकसान करणारा आणि उद्योगाचं भलं करणारा हा कायदा आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केलीय. तसंच भूसंपादन विधेयक शेतकरीविरोधी असून केंद्रातील सरकार प्रॉपर्टी डिलर सारखं काम करत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केलाय.

भूसंपादन विधेयकाविरोधात अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर दोन दिवसांचं आंदोलन पुकारलंय. आज या आंदोलनाला शेवटच्या दिवशी महत्वपूर्ण वळणं मिळालं. ऐकेकाळी अण्णा हजारेंच्या आंदोलनात समोर राहणारे अण्णांचे शिष्य अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही सहभागी झाले. केजरीवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज जंतरमंतरवर हजेरी लावली. या आंदोलनात आपणही अण्णांसोबत असल्याचं केजरीवाल यांनी जाहीर केलं. काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीच फरक नाही, शेतकर्‍यांचं नुकसान करणारा आणि उद्योगाचं भलं करणारा हा कायदा आहे, अशी टीकाही केजरीवाल यांनी केलीये. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा आहे असे सांगतानाच अण्णा हजारे यांनी सचिवालयात यावं असं निमंत्रण केजरीवाल यांनी अण्णांना दिले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीच फरक नाही. भूसंपादन विधेयक शेतकरीविरोधी असून केंद्रातील सरकार प्रॉपर्टी डिलरसारखे काम करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. तसंच शेतकर्‍यांचं नुकसान करणारा आणि उद्योगपतींचं भलं करणारा हा त्यांचा कायदा आहे, असंही केजरीवाल म्हणाले. दरम्यान, आता उपोषण न करता जिवंत असेपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचं अण्णा हजारेंनी यावेळी म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2015 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close