S M L

शिवसेना नेत्यांमध्ये संवादाचा अभाव ?

Samruddha Bhambure | Updated On: Feb 24, 2015 09:55 PM IST

शिवसेना नेत्यांमध्ये संवादाचा अभाव ?

24 फेब्रुवारी :  शिवसेनेत संवादाचा अभाव असल्याचे आज (मंगळवारी) पहायला मिळाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकल्याची पक्षाची भूमिका असताना शिवसेनेच्या 8 खासदारांनी हजेरी लावली आहे.

भूसंपादन विधेयकाबाबत दिल्लीत एनडीएची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीवर शिवसेनेनं बहिष्कार टाकल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. 'एनडीएची बैठक होत असेल तर होऊ दे. त्या बैठकीला शिवसेनेचा प्रतिनिधी जाणार नाही. सध्या देशभरातून राजधानीत शेतकरी आले आहेत. त्यांचं बोलणंही सरकारने ऐकावं, अशी आमची अपेक्षा आहे. शिवसेना सरकारमध्ये असली तरी आधी आम्ही शेतकर्‍यांसोबत आहोत. त्यांच्या हिताशी आम्ही बांधिल आहोत. शेतकरी जर या विधेयकाला विरोध करत असतील तर त्यांच्याशी चर्चा केली गेली पाहिजे. त्यांचं म्हणणं ऐकून त्यावर सर्वसहमती मिळवली पाहिजे', अशी अपेक्षा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र, राऊत यांनी हे विधान केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच शिवसेनेच्या बहिष्कारातील हवा निघून गेली.

गजानन कीर्तिकर, विनायक राऊत, अरविंद सावंत, रवी गायकवाड, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने आणि श्रीरंग बारणे असे आठ खासदार शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीला हजर होते. त्यामुळे शिवसेनेत संवादाचा अभाव असल्याचं उघड झालं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2015 09:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close